Home / News / स्विगीचा आयपीओ अखेर खुला! गुंतवणूक ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार

स्विगीचा आयपीओ अखेर खुला! गुंतवणूक ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार

नवी दिल्ली- ऑनलाइन ऑर्डर घेऊन फूड सर्व्हिस देणाऱ्या स्विगी या आघाडीच्या कंपनीचा बहुचर्चित आयपीओ म्हणजेच प्रारंभिक भाग विक्री अखेर आज...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- ऑनलाइन ऑर्डर घेऊन फूड सर्व्हिस देणाऱ्या स्विगी या आघाडीच्या कंपनीचा बहुचर्चित आयपीओ म्हणजेच प्रारंभिक भाग विक्री अखेर आज बुधवारी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली. हा आयपीओ आजपासून शुक्रवार ८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या आयपीओमधून ११,३२७.४३ कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

आज पहिल्या दिवशी ग्रे मार्केटमध्ये स्विगीचे शेअर ११ रुपये प्रीमियरवर व्यवहार करीत होते.या कंपनीने आधी जाहीर केल्याप्रमाणे पहिल्या सार्वजनिक भाग विक्रीसाठी ३७१ ते ३९० रुपये प्रति शेअर किंमतपट्टा निश्चित केला होता. स्विगी आयपीओ लॉट साइज ६५ इक्विटी शेअरचा आहे. कंपनीच्या ११,३२७.४३ कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये ४,५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर आणि ६,८०० कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. स्विगीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शेअर राखीव ठेवण्यात आले आहेत. तर १५ टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.कर्मचाऱ्यांना प्रति शेअर २५ रुपयांची सवलत दिली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts