हजारो फूट उंचीवर असताना विमानाचा दरवाजा हवेत उडाला

पोर्टलँड –
आत्मघाती हल्ले रोखण्यासाठी रेड झोनमध्ये क्रॅश रेट केलेले बोलार्ड बसवण्यात आले आहेत. कोणतीही संशयास्पद वस्तू मंदिरापर्यंत पोहोचू नये यासाठी वाहन स्कॅनर, टायरचा रंग, बूम बॅरिअर्स लावण्यात आले आहेत आणि इतर गोष्टी रोखण्यासाठी विशेष एसटीएफटी टीमचे एटीएस कमांडो तैनात केले जातील. याशिवाय अयोध्येबाबत १०० कोटी रुपयांचे बजेट राखीव ठेवण्यात आला असून, त्याचा आढावा गृहखात्याकडूनच घेतला.

अमेरिकेतल्या एका विमानतळावरून विमानाने हवेत उड्डाण केल्यानंतर विमानाचा दरवाजा उडून गेल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. अलास्का एअरलाईन्सच्या बोइंग ७३७-९ मॅक्स विमानाने पोर्टलँड विमातळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळात हे विमान १५ हजार फूटांहून अधिक उंचीवर पोहोचले. विमान हवेत असताना अचानक या विमानाचा दरवाजा उडाला. त्यामुळे विमानातील प्रवासी घाबरले होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, सेंट्रल केबिनचा एक्झिट दरवाजा विमानापासून पूर्णपणे निखळून हवेत उडून गेला आहे. दरवाजा उडून गेल्यानंतर विमानातले प्रवासी घाबरले होते. तसेच प्रवाशांचा गोंधळ ऐकायला मिळत आहे. विमानाचा दरवाजा उडून गेल्यानंतर काही प्रवासी त्यांची खुर्ची घट्ट पकडून बसले होते, तर काहीजण घाबरून आरडाओरड करताना दिसत आहेत.

अलास्का एअरलाईन्सने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अलास्का एअरलाईन्सने म्हटले आहे की, पोर्टलँडहून ओन्टारियो आणि कॅलिफोर्नियाला जाणाऱ्या एएस-१२८२ विमानाला शुक्रवारी सायंकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला. या विमानात १७१ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. दुर्घटनेनंतर काही वेळात हे विमान पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. ही दुर्घटना कशामुळे घडली याचा आम्ही तपास करत आहोत. तपासाअंती बाहेर येणारी माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top