हाँगकाँगमध्ये जिमी लाइ यांच्यावरील ऐतिहासिक खटल्याची सुनावणी सुरू

हाँगकाँग-असंतुष्टांना चिरडण्यासाठी बीजिंगने लादलेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेले हाँगकाँगमधील लोकशाहीवादी नेते आणि प्रकाशक जिमी लाई यांच्या ऐतिहासिक राष्ट्रीय सुरक्षा खटल्याची सुनावणी अखेर कालपासुन सुरू झाली. लाई दोषी ठरल्यास त्यांना जन्मठेप होऊ शकते.लाई यांचे पूर्ण नाव लाइ-ची-यिंग असे आहे.

७६ वर्षीय लाइ यांना ऑगस्ट २०२० मध्ये चार वर्षांपूर्वी मोठ्या निषेधानंतर लागू केलेल्या व्यापक राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत शहराच्या लोकशाही समर्थक चळवळीवर कारवाई करताना अटक करण्यात आली होती.त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी परदेशी सैन्याशी संगनमत केल्याचा आणि देशद्रोहाची प्रकाशने काढण्यासाठी इतरांसोबत कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

१९७८ मध्ये चीनी राजवटीत परतल्यानंतर पूर्वीची ब्रिटीश वसाहत ५० वर्षे आपले पाश्चात्य-शैलीचे नागरी स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकते असे वचन चीनने दिले होते. परंतु अलिकडच्या वर्षांत, हाँगकाँग सरकारने भाषण स्वातंत्र्यावर कठोरपणे मर्यादा आणल्या आहेत. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी नेते जिमी लाइ यांना फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत दोषी ठरवण्यात आले आहे. चीनच्या कम्युनिस्ट शासनपद्धतीचे कठोर टीकाकार म्हणून लाइ ओळखले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top