हाफिजचा सहकारी भुट्टावीचा पाकिस्तानाच्या तुरुंगात मृत्यू

इस्लामाबाद

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानातील तुरुंगात मृत्यू झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिली. २९ मे २०२३ रोजी भुट्टावीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तब्बल ७ महिन्यानंतर या माहितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या माहितीनुसार, ‘७७ वर्षीय भुट्टावीचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके शहरातील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यामुळे २९ मे २०२३ रोजी भुट्टावीचा मृत्यू झाला. पाकिस्तान सरकारने त्याला तुरुंगात टाकले होते. हाफिज सईद भुट्टावी हा २००२ पासून लाहोर येथून लष्कर-ए-तैयबाचा कारभार चालवत होता. भुट्टावीने मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजवाली होती. या हल्ल्यात तब्बल १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तो पाकिस्तामधील तुरुंगात शिक्षा भोगत होता. भारताने पाकिस्तानकडेत्याचा ताबा मागितला होता. भुट्टावीने मुंबई हल्ल्यासाठी आत्मघातकी पथक तयार करण्यास पाकिस्तानमधील तरुणांना प्रवृत्त केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top