Home / News / हिंदी भाषा लादू नये! कन्नडनंतर कमल हसनचे हिंदीबद्दल विधान

हिंदी भाषा लादू नये! कन्नडनंतर कमल हसनचे हिंदीबद्दल विधान

चेन्नई – दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन पुन्हा एकदा त्यांच्या भाषिक भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी हिंदी अचानक लादली जाऊ नये....

By: Team Navakal

चेन्नई – दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन पुन्हा एकदा त्यांच्या भाषिक भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी हिंदी अचानक लादली जाऊ नये. कारण असे अचानक झाले, तर अनेक लोक निरक्षर ठरतील. असे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कन्नड ही तामिळमधून जन्मलेली भाषा आहे. असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचे कर्नाटकमध्ये प्रदर्शन रोखण्यात आले. एवढेच नव्हे तर, कर्नाटक उच्च न्यायालयानेही त्यांच्या विधानाबद्दल त्यांना फटकारले.

कमल हसन म्हणाले की, मी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बाजूने आहे. हीच ठिकाणे नाहीत जिथे भाषा लादली जात आहे. मी एक दूजे के लिए’ या चित्रपटात अभिनेता होतो. मी लादल्याशिवाय हिंदी शिकलो. भाषा शिकणे ही शिक्षणप्रक्रियेचा भाग आहे. ती सहज आणि अडथळेविनाच व्हायला हवी. लादणे हे चुकीचे आहे. कारण हिंदी अचानक लादली तर अनेक लोक निरक्षर राहतील. आपल्याकडे ३५० वर्षांचा इंग्रजी शिक्षणाचा इतिहास आहे. ती भाषा हळूहळू आणि स्थिरपणे विकसित झाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हायचं असेल, तर स्पॅनिश किंवा चिनी भाषाही शिकता येईल, पण इंग्रजी हा अधिक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या