Home / News / हिंदू एकात्मतेसाठी छतर पूरातून धीरेंद्र शास्त्रींची हिंदू यात्रा सुरू

हिंदू एकात्मतेसाठी छतर पूरातून धीरेंद्र शास्त्रींची हिंदू यात्रा सुरू

छतरपूर – हिंदूंमधील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा भेद दूर करण्यासाठी आजपासून छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र...

By: E-Paper Navakal

छतरपूर – हिंदूंमधील जातीभेद आणि अस्पृश्यतेचा भेद दूर करण्यासाठी आजपासून छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या १० दिवसीय हिंदू जोडो यात्रेला सुरू झाली. या यात्रेसाठी लोकांचा मोठा जनसागर लोटला. या लोकांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांनी मशिदींत आणि मंदिरांत आरतीनंतर वंदे मातरम म्हटले जावे,अशी मागणी केली.ही यात्रा सुरू होण्याआधी धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, लोकांनी मला बोलावले तर मी कुठेही जातो. लोकांच्या आग्रहानुसार मी दुबई, मॉरिशस आणि नेपाळलाही जातो. मला पाकिस्तानात बोलावले तर मी तिथेही जाईन. भारतातील मुस्लिमांनी मला मशिदीत बोलावले तर मी तेथेही जाईन. आपल्या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. अनेक ठिकाणी या यात्रेचे स्वागत होणार आहे. आम्ही जगाला सांगतो की, सर्व हिंदू एक आहेत. हिंदू आता जागे झाले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी जे वातावरण होते तेच वातावरण आज हिंदू एकात्मतेतून दिसून येत आहे. हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे होते. आपण एकसंध राहणे देखील महत्त्वाचे आहे. समाजातून भेदभाव दूर केला पाहिजे. २००५ पर्यंत वक्फकडे काहीच एकर जमीन होती. मात्र आज 7.5 लाख एकर जमीन आहे. ते आता संसदेवरही दावा करत करतील.

Web Title:
संबंधित बातम्या