बर्लिन- हिवाळ्यातील वादळामुळे मध्य युरोपातील दक्षिण जर्मनी आणि ऑस्ट्रिया,स्वित्झर्लंड आणि झेक प्रजासत्ताकच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली. हिमवादळामुळे म्युनिकच्या विमानतळावर विमानसेवा ठप्प झाली. बस आणि अनेक रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या.
काल शनिवारी दुपारी म्युनिकच्या मध्यवर्ती स्थानकाकडे जाणार्या आणि येणार्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या होत्या, तर जर्मनीच्या राष्ट्रीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या तर काही गाड्या उशिरा सोडल्या.तसेच हिमवादळामुळे जर्मनीतील सर्व ट्रेन बर्फाने आच्छादित दिसत होत्या.अलियांझ स्टेडियम बर्फ कोसळल्यामुळे बायर्न म्युनिक आणि युनियन बर्लिन यांच्यातील फुटबॉल सामना रद्द केला. झाडे कोसळल्याने जर्मनीच्या दक्षिण-पूर्वेकडील बाव्हेरिया राज्यात हजारो घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.