हैद्राबादहून अयोध्येत येणार बाराशे किलोचा बुंदीचा लाडू

हैद्राबाद
अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी हैद्राबादच्या नागभूषण रेड्डी यांनी बाराशे किलोचा राम लाडू तयार केला असून येत्या २२ जानेवारीला तो अयोध्येत रामाच्या नैवेद्यात ठेवण्यात येणार आहे.
अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामासाठी विविध पदार्थ येत असून त्यात हैद्राबादच्या नागभूषण रेड्डी यांनी तयार केलेला बाराशे पासष्ठ किलोचा एक लाडू सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे. हा लाडू एका विशेष ट्रकने अयोध्येत पाठवला जाणार आहे. यासाठी एक खास शीतपेटीही तयार करण्यात आली आहे. हा लाडू एक दिवस आधी अयोध्येला पोहोचणार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top