हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन घरातील टबमध्ये मृतदेह आढळला

लास वेगास

फ्रेंड्स या नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शोमधील शँडलरची भूमिका साकारणारा ५४ वर्षीय अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन झाले. त्याचा मृतदेह राहत्या घरी बाथटबमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उघड झालेले नाही. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता असलेल्या मॅथ्यू पेरीचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ मध्ये विलियमस टाऊन येथे झाला. तो एक विनोदी नट आणि निर्माता होता. त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केले. ‘ मिस्टर सनशाइन’ या मालिकेचा तो सह निर्माता, सहलेखक आणि कार्यकारी निर्माता होता. त्यानंतर त्याने ‘द ऑड कपल’ मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले. फ्रेंड्स या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहचला. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावरून अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top