हॉलिवूड अभिनेते टायलर ख्रिस्तोफर यांचे निधन

वॉशिंग्टन

हॉलिवूड अभिनेते टायरल ख्रिस्तोफर यांचे वयाच्या ५० व्या वर्षी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जनरल हॉस्पिटल आणि डेज ऑफ अवर लाईव्समधील भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.

टायलर ख्रिस्तोफर यांनी १९६९ ते २०१६ पर्यंत ‘जनरल हॉस्पिटल’मध्ये निकोलस कैसडाइनच्या माध्यमातून परीक्षकांचे चांगले मनोरंजन केले. डेज ऑफ अवर लाईव्स फ्रॉममध्ये त्यांनी साकारलेली डिमेरा ही भूमिका चांगलीच गाजली. ख्रिस्तोफर हे लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते होते. ख्रिस्तोफर यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. ईवा लोंगोरियासोबत ते २००२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी वैनेसा मार्सिल आणि नतालिया लिविंगस्टन यांना डेट करायला सुरुवात केली होती. टायलर यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top