होंडुरासमध्ये अपघात १२ जणांचा मृत्यू

टेग्यूसिगॅल्पा :

मध्य अमेरिकेमधील देश होंडुरासमध्ये काल एक बस महामार्गावरून घसरून दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला, तर २४ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘बसमध्ये सुमारे ६० जण प्रवास करत होते. देशाची राजधानी टेग्यूसिगॅल्पा पासून सुमारे ४१ किलोमीटर (२५ मैल) महामार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघांचा टेग्यूसिगॅल्पा येथील रुग्णालयात मृत्यू झाला.’ याशिवाय होंडुरासचे राष्ट्राध्यक्ष झिओमारा कॅस्ट्रो यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की,’ सरकारने ३ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. सरकार मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top