१२ फेब्रुवारीला कोकण रेल्वे मार्गावर पहिली अयोध्या दर्शन ट्रेन

पणजी

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशभरातील रामभक्तांना अयोध्येला जाण्याची ओढ लागली आहे. देशातील भाविकांना अयोध्येत जाऊन प्रभू रामांचे दर्शन घेता यावे, यासाठी भारतीय रेल्वेमार्फत (आयआरसीटीसी) ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत. देशभरातील ६६ स्थानकांवरून अयोध्या दर्शनासाठी या ‘आस्था ट्रेन’ चालवल्या जाणार आहेत. यामध्ये कोकणातील रेल्वे स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. यातील कोकण रेल्वेवरील पहिली आस्था ट्रेन गोव्यातील वास्को जंक्शनवरून १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. ही ट्रेन मजोरडा, मडगाव, करमाळी, थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड ही गोवा तसेच महाराष्ट्रातील स्थानके घेत उत्तर प्रदेशातील अयोध्येकडे रवाना होईल.भाविकांचे अयोध्येतील दर्शन झाल्यानंतर त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचवण्यासाठी आयआरसीटीसीमार्फत विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top