१२ वर्षांच्या भारतीय मुलीने दुबईतीलपरिषदेत झळकावला निषेधाचा फलक

दुबई – मणिपूरमधील १२ वर्षीय हवामान कार्यकर्ती लिसिप्रिया कंगुजम हिने काल दुबईतील जागतिक हवामान विषयक शिखर परिषदेत संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.या मुलीने अचानकपणे परिषदेच्या व्यासपीठावर पोहचून निषेधाचा फलक झळकावला.

लिसिप्रिया कंगुजम ही अचानकपणे संयुक्त राष्ट्रांच्या या हवामान परिषदेच्या व्यासपीठावर पोहोचली.
त्यावेळी तिच्या हातात “जीवाश्म इंधन वापर टाळा,आपली पृथ्वी आणि आपले भविष्य वाचवा” असा मजकूर लिहिलेला फलक होता.हा फलक उंचावून तिने मोठमोठ्याने घोषणाही दिल्या.यावेळी तिला सुरक्षा रक्षकांनी बाजूला नेले.मात्र नंतर या शिखर परिषदेचे राजदूत माजिद अल सुवैदी यांनी लिसिप्रियाच्या वैचारिक धाडसाचे आणि कल्पकतेचे कौतुक केले.तसेच उपस्थितांना टाळ्या वाजवायला सांगून तिला प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. या परिषदेला १९० राष्ट्रांतील सुमारे ६० हजार प्रतिनिधी उपस्थित होते.

या घटनेनंतर लिसिप्रिया हिने एक्सवरून त्या घटनेचा व्हिडिओ आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.त्यात तिने म्हटले आहे की, मी घोषणा दिल्यानंतर त्यांनी मला ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबवून ठेवले. माझे ओळखपत्रही काढून घेतले. त्यांनी माझ्या विचाराला पाठिंबा द्यायला हवा होता. खरे तर त्यांनी माझ्याशी जे काही केले ते संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top