१६ व्या मजल्यावरून उडी मारून वृद्ध महिलेची आत्महत्या

मुंबई- इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून ६५ वर्षांच्या वृद्ध महिलेने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना मुलुंड परिसरात घडली. सीताबाई शिवाजी माने असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
सीताबाई माने या मुलुंडमधील भीमवाडीतील एका इमारतीत १६ व्या मजल्यावर राहत होत्या. मुलगा आणि सूनेसोबत राहणार्‍या सीताबाई या गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होत्या.त्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते.मात्र त्यांचे नैराश्य आणखीनच वाढत चालले होते.त्यातच त्यांनी सोमवारी दुपारी राहत्या घराच्या बाल्कनीतून बाहेर उडी मारली. ही घटना समजताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top