१ एप्रिलपासून विमा पॉलिसीसाठी नवीन डिजिटल पद्धत अनिवार्य

नवी दिल्ली- शेअर बाजारातील व्यवहार जसे डिमॅट खात्याद्वारे केले जातात.त्याचप्रमाणे आता विमा पॉलिसीचे व्यवहारही इलेक्ट्रॉनिक म्हणजेच डिजिटल पध्दतीने केले जाणार आहेत. आयआरडीएआय अर्थात
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांसाठी ही नवीन डिजिटल पद्धत १ एप्रिलपासून जारी करणे अनिवार्य असणार आहे.

विमा क्षेत्रात सुसूत्रीकरण आणण्यासाठी आता जीवन विमा,आरोग्य विमा आणि सर्वसाधारण विमा पॉलिसी ऑनलाइन अकाऊंटद्वारे हाताळता येणार आहे. वास्तविक२०१३ मध्ये हा पर्याय हा पर्याय निवडला होता. आता कारवी, सीएएमएस रिडिपॉझिटरी, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट व सेंट्रल इन्शुरन्स रिडिपॉझिटरी ऑफ इंडिया ई-विमा खाती उघडण्यासाठी मदत करणार आहेत. विद्यमान पॉलिसींचे ई-विमा पॉलिसींमध्ये रूपांतर करणे विनामूल्य आहे. पॉलिसीधारकांसाठी अखंड आणि किफायतशीर संक्रमण सुलभ करण्याच्या उद्देशाने ही नवीन सेवा उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top