१ जूनपर्यंत विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद

पंढरपूर

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना १ जूनपर्यंतची प्रतिक्षा करावी लागणार आहे. विठ्ठल मंदिर जीर्णोधराचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. हे काम मे महिन्याअखेर पर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेर पर्यंत भाविकांना केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने काल मंदिरातील कामाची पाहणी करून आढावा घेण्यात आला. यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरातील अनेक ठिकाणी नव्याने दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे आढळले. त्यामुळे ही दुरुस्ती सुरु करण्यात आली असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top