२०२४ मध्ये भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर

नवी दिल्ली –
२०२४ मध्ये भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्याची योजना भारताने आखली आहे. यासाठी भारतीय अंतराळ इस्रो आणि अमेरकेची अंतराळ संस्था नासा एकत्र काम करणार आहेत.भारत दौर्यावर आलेले नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी याबाबत घोषणा करत सांगितले की,२०२४च्या अखेरीस नासा भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात मदत करेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) माध्यमातून अंतराळवीरांची निवड केली जाईल. यामध्ये नासाची कोणतीही भूमिका नसेल. मोहिमेसंदर्भात इतर तपशीलांवर काम सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top