२० मे रोजी मेट्रो प्रवाशांना तिकिटांत १० टक्के सवलत

मुंबई- मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने मतदानाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे.पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर १० टक्के सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top