२० लाख रुपयांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला रंगेहात अटक

चेन्नई- तामिळनाडूमधील दिंडीगुलमध्ये ईडी अधिकारी अंकित तिवारीला एका डॉक्टरकडून २० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने शुक्रवारी ही कारवाई केली. यासंदर्भात ईडी कार्यालयाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. आरोपी अंकितला १५ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावन्यात आली आहे.
अंकित तिवारी याने दिंडीगुलमधील एका डॉक्टरकडून त्याच्या विरोधी सुरू असलेला खटला बंद करण्यासाठी ३ कोटी रुपयांची लाच मागितली होती. मात्र नंतर अंकितने ही रक्कन कमी करून ५१ लाख रुपये मान्य केले. १ नोव्हेंबर रोजी डॉक्टरने अंकितला २० लाख रुपये दिले. त्यानंतर अंकितने डॉक्टरकडे संपूर्ण रक्कमेची मागणी केली. यानंतर डॉक्टरने अंकित विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल अंकितला रंगेहात अटक केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दिंडीतील घरावर छापे टाकले. यावेळी त्याच्या घरून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास करताना मदुराई आणि चेन्नईतील अनेक ईडी अधिकारीदेखील या प्रकरणात सामील असल्याचे आढळले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top