२१ वर्षांच्या मोक्षाने हजारोंच्या साक्षीने घेतली विधिवत दीक्षा

श्रीरामपूर- शहरातील जैन समाजातील २१ वर्षांची बीए सायकॉलॉजीचे शिक्षण घेतलेली मोक्षा प्रशांत चोपडा हीचा जैन भागवती दीक्षा ग्रहण कार्यक्रम महाराष्ट्रातील जैन संत, साध्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोक्षा हिचा हजारो नागरिकांच्या साक्षीने साध्वीचे वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला.मोक्षा आता ‘पपपु महीताश्रीजी महाराज साब’ या नावाने ओळखली जाणार आहे.यावेळी मोक्षाच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला.अनेक दिग्गजांनी या वस्तू रोख रक्कम देऊन घेतल्या.

मोक्षा ही व्यापारी नेमीचंद माणकचंद चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत व प्रिती प्रशांत चोपडा यांची कन्या आहे.मोक्षा हिने तीन चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्नई बंगळुरू,बीड,जामखेड, छत्रपती संभाजीनगर असा सुमारे ३ हजार किलोमीटर प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे.जैन धर्मियात लहान वयापासूनच धार्मिक शिकवण दिली जाते.दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरू प्रतिभाकंवरजी यांचा पहिल्यांदा सहवास लाभला. तेव्हापासूनच भौतिक सुखापासून अलिप्त राहण्याचा विचार दीक्षा करत होती.जैन भागवती दीक्षा महोत्सवानिमित्त जैन स्थानकात १ ते ११ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोक्षा चोपडा हि नवकार आराधिका प्रतिभाकंवरजी व आयंबिल तप आराधिका जिनशासन प्रभावीका प्रफुल्लाजी आदि साध्वी मंडळाच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषि यांच्या अरविंदाने दीक्षापाठ अंगीकारुन जैन साध्वी झाली.दीक्षा महोत्सवासाठी मैनसाधक सौरभमुनि, युवा प्रणेते गौरवमुनि, शालिभद्र, प्रणवमुनि, सार्थकमुनि व सक्षममुनिजी आदि संत महात्म्याच्या समवेत नवकार आराधिका प्रतिभा, आयंबिल आराधिका प्रफुल्ला आदीसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र चेन्नई बेंगलोर आधी राज्यातील हजारो जैन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top