२२ जानेवारीला ‘एम्स’मधील ओपीडी सेवा सुरूच राहणार

नवी दिल्ली- दिल्लीतील एम्सने उद्या २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.२२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक दिनी दिल्लीतील सर्व केंद्रीय रुग्णालयांमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टीही जाहीर करण्यात आली होती.यावर विरोधकांनी आश्चर्य व्यक्त करत या निर्णयावर टीका केली होती. त्यामुळे अखेर एम्सने आपला निर्णय मागे घेतला आहे.

याआधी शनिवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील एम्स आणि दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयासह केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी चारही रुग्णालये २२ जानेवारीला दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील, असे सांगण्यात आले होते.मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहणार होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.आता ओपीडी सुरू राहणार आहे.दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने २२ जानेवारीला सर्व केंद्रीय संस्थांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, गोवा,छत्तीसगड या राज्य सरकारांनी तर सुट्टी जाहीर केली आहे.तसेच त्याचवेळी उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम,छत्तीसगड, उत्तराखंड,मध्य प्रदेश आणि हरियाणा या सात राज्यांमध्ये उद्या २२ जानेवारी रोजी दारूची विक्री होणार नाही आणि यादिवशी ड्राय डे असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top