२२ फेब्रुवारीपासून चेंबूरमध्ये रंगणार ‘माहुल फेस्टिवल’ कोळी महोत्सव

मुंबई- माहुल ग्राम समिती व माहुल ग्राम हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे विश्वस्त समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या सौजन्याने चार दिवसीय
१७ वा माहुल फेस्टिवल कोळी महोत्सव २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान चेंबूरच्या
माहुल गावामध्ये रंगणार आहे.

या महोत्सवाची सुरुवात २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री एकविरा आई देवीच्या पालखी मिरवणुकीने होणार आहे.ही पालखी हनुमान मंदिर ते माहुल मैदानपर्यंत निघेल आणि पुढील तीन दिवस दररोज सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होतील.या महोत्सवाला अनेक सिने अभिनेते तसेच राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. आगरी कोळी बांधवांना एकत्रित करुन त्यांच्या कलागुणांना वाव देत समाजाच्या संस्कृतीचा वारसा जतन करणे आणि फ्लेमिंगो पक्ष्याचा प्रचार- प्रसार करण्याच्या उद्देशाने होणार्‍या या महोत्सवात अनेक सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.यामध्ये पारंपारिक नृत्य कार्यक्रमांबरोबरच आगरी कोळी समाजातील चविष्ट आणि चमचमीत मटण, म्हावरा,मासे आणि तांदळाची भाकरी अशा खादय पदार्थांची मेजवानी असणार आहे.तरी परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजेंद्र माहुलकर, सेक्रेटरी आशिष चव्हाण,उप सेक्रेटरी जगन्नाथ पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top