२६ एप्रिलला लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान

-महाराष्ट्रातील ८ जागांचा समावेश

नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने सुरू सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील एकूण ८८ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल, ओम बिर्ला, हेमा मालिनी, एचडी कुमारस्वामी, अरुण गोविल आणि प्रल्हाद जोशी हे नेते उमेदवारीच्या रिंगणात आहेत. राहुल गांधी वायनाडमधून, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडच्या राजनांदगाव मतदारसंघातून लोकसभा लढवत आहेत. आसाममधील ५ जागांसाठी, बिहारमधील ५ जागांसाठी, छत्तीसगडमधील ३ जागांसाठी, कर्नाटकातील १४ जागांसाठी, केरळमधील २० जागांसाठी, मध्य प्रदेशातील ७ जागांसाठी, महाराष्ट्रातील ८ जागांसाठी, मणिपूर आणि त्रिपुरा १, राजस्थानातील १३ तर उत्तर प्रदेशातील ८ आणि पश्चिम बंगालमधील ३ जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या जागांचा समावेश आहे.आसाममधील करीमगंज, सिलचर, मंगलदोई, नॉगोंग आणि कालियाबोर या राज्यांत दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. बिहारमधील किशनगंज, कटिहार, पूर्णिया, भागलपूर, बांका तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव, महासमुंद, कांकेर या मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. जम्मूमध्येदेखील दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top