२६ जानेवारीला राममंदिर भाविकांसाठी खुले होणार

अयोध्या- उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत फेब्रुवारी २०२४ पर्यंत रामलल्लाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक करून मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साधूसंतांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मंदिर २६ जानेवारीपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी काल दिली.

२२ जानेवारीच्या मंदिर उद्घाटन सोहळ्याला केवळ निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी हे मंदिर खुले करण्यात येणार आहे. एका दिवसात सुमारे ७५ हजार लोकांना राम मंदिराचे सहजगत्या दर्शन घेता येणार आहे.भाविकांच्या निवासाची आणि जेवणाची सोयही केली जाणार आहे.
विशेष ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित भाविकांना फोन करून कळविले जाईल.त्यादिवशी त्यांना दर्शन घेता येईल, ही नोंदणी राज्यनिहाय होणार आहे.
त्याचप्रमाणे मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या
तळमजल्यावर १६० खांब उभारण्यात आले आहेत. प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी सुमारे १५ ते २० सेकंदांचा अवधी मिळेल पण तो तृप्त होईल. या मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत ९०० कोटींहून अधिक खर्च झाला असून संपूर्ण मंदिर आणि संकुलाच्या बांधकामासाठी सुमारे १७०० ते १८०० कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top