३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या मरूबाईचा नवरात्रोत्सव

मुंबई – तब्बल ३०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा आलेल्या माटुंगा बेटावरील आद्य ग्रामदैवत श्री मरूबाई गावदेवीचा वार्षिक शारदीय नवरात्रोत्सव यंदा पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.

रविवार १५ ऑक्टोबर रोजी अभिषेक, घटस्थापना आणि दीपपूजेने या उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर विनायक चतुर्थी,भजन, भक्तिगीते गणपती हवन, ललिता पंचमी आणि हळदी कुंकू समारंभ आदी धार्मिक उपक्रम पार पडतील. २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा सण परंपरेनुसार साजरा केला जाणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या संपूर्ण नवरात्री सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंड आणि अनिल गावंड यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top