३० वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने आपला की-बोर्डमध्ये बदलला

सॅनफ्रान्सिस्को- जागतिक स्तरावरील नामांकित मायक्रोसॉफ्ट कंपनीने तब्बल ३० वर्षांनंतर आपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉप की-बोर्डमध्ये बदल केला आहे. ‘को पायलट’ हे आपले एआय टूलला लाँच करतानाच कंपनीने हा नवीन कीबोर्ड सादर केला आहे. वापरकर्त्यांना कम्प्युटर वापरण्याचा अनुभव अधिक सुलभ व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नव्या की-बोर्डमध्ये उजव्या बाजूला असणाऱ्या विंडोज बटणाऐवजी ‘को पायलट’ हे बटण असणार आहे.ओईएम अर्थात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफ्रॅक्चरर आणि इतर मार्केटमध्ये याची जागा वेगळी असणार आहे.
सध्या हा बदल मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या काही ठराविक पर्सनल कम्प्युटरमध्ये दिसणार आहे.१९९४ साली मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा विंडोज बटण सादर केले होते.यानंतर आता तब्बल ३० वर्षांनी कीबोर्ड लेआऊटमध्ये बदल करण्यात आला आहे. या नव्या बटणाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.सीइएस टेक्नॉलॉजी कॉन्फरन्समध्ये हा नवा की-बोर्ड सादर करण्यात येणार आहे.

मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वीच आपल्या को-पायलट या एआय टूलचे अँड्रॉईड आणि आयओएस अ‍ॅप लाँच केले होते. या अ‍ॅपमध्ये चॅटजीपीप्रमाणे प्रश्न विचारता येऊ शकतात. तसेच, जेनरेटिव्ह इमेजेस आणि एआय गाणीही तयार करता येऊ शकतात. अ‍ॅपव्यतिरिक्त वेबसाईटवर जाऊनही हे एआय टूल वापरता येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top