Home / News / ५३५ कोटींचा प्रकल्प स्थगित! सत्तारांना हायकोर्टाचा दणका

५३५ कोटींचा प्रकल्प स्थगित! सत्तारांना हायकोर्टाचा दणका

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ५३५ कोटींच्या प्रकल्पाला स्थगित देत न्यायालयाने दणका दिला आहे....

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ५३५ कोटींच्या प्रकल्पाला स्थगित देत न्यायालयाने दणका दिला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मतदारसंघातील भराडी निम्न मध्यम प्रकल्पास मंजुरी मिळवली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्तार यांच्यावर झाला होता. ७ ऑक्टोबरला या प्रकल्पाच्या मंजुरीला भाजपा माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करत आव्हान दिले होते.

याप्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी नसल्याने संबंधित प्रकल्पात पाणी साठणार नाही. असा ‘मेरी’चा अहवाल असताना, या अहवालाकडे अब्दुल सत्तार यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले. तसेच आधीच कोल्हापुरी बंधार असताना नव्याने नऊ साखळी बंधाऱ्यांवर ५३४.९२ कोटी रुपये खर्च करणे हा पैशाचा अपव्यय ठरेल.असे म्हणत, न्या. मंगेश पाटील व न्या. प्रफुल्ल खुबाळकर यांनी या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली.

Web Title:
संबंधित बातम्या