५ वी – ८वीचा आज मूल्यमापन निकाल

मुंबई

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने मार्च महिन्यात ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन आयोजित केले होते. १२ ते ३० मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या मुल्यमापनाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळावर उद्या दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. संकेस्थळावर विषयानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी दर्शवली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक आणि लातूर या ७ विभागीय मंडळानी ५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन आयोजित केले होते. याचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थी या निकालाची प्रतदेखील घेऊ शकतात. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्र. सचिव माणिक बांगर यांनी सांगितले, पात्र विद्यार्थ्यांना ५ वी ते ८ वी पर्यंतची अर्हता आणि विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र लवकरच वितरीत केले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top