७ वाजताचा मुहूर्त साधत उदयनराजे भाेसलेंचे मतदान

सातारा

सातारा लाेकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज ७ वाजताचा मुहूर्त साधत मतदान केले. उदयनराजे यांनी सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर ७ वाजून ७ मिनिटांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत आई कल्पनाराजे भाेसले आणि पत्नी दमयंतीराजे भाेसले देखील उपस्थित होते. उदयनराजे भाेसले यांनी ७ वाजून ७ मिनिटांचा मुहुर्त साधत मतदान केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. मतदानाला जाण्यापूर्वी उदयनराजे यांनी श्री तुळजाभवानी माता व छत्रपती प्रतापसिंहमहाराजांचे शुभाशिर्वाद घेतले. उदयनराजेंनी म्हटले आहे की, निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आज सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात सहभागी व्हा व देशाची लोकशाही बळकट करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top