16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेशबंदी

नवी दिल्ली – खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक दंड व मान्यताही रद्द केली जाऊ शकते.
नव्या नियमानुसार कोचिंग क्‍लासमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेसना बंधनकारक असणार आहे. खासगी कोचिंग सेंटर उघडता येणार नाही. त्यासाठी सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. त्याशिवाय कोचिंग सेंटर चालवणार्‍यांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल. जर या नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा 25 हजार पुन्हा उल्लंघन केल्यास 1 लाख व त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झाल्यास कोचिंग क्लासची मान्यताच रद्द होणार आहे.
नीट किंवा जेईईची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासमध्ये मनमानी फी आकारली जाते. त्यामुळे या सर्वांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, आयआयटी जेईई, एमबीबीएस, नीट यासारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी कोचिंग सेंटरमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय सुरक्षासंदर्भात एनओसी असणंही बंधनकारक करण्यात आलेय. परीक्षा आणि त्याच्या निकालाच्या दबावाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित धडे आणि पाठबळ द्यावे, असेही नियमांत म्हटलेय. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल.
नव्या नियमांनुसार, एखाद्या कोर्सदरम्यान कोचिंग सेंटरला फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. हॉस्टेल आणि मेस फी देखील परताव्यात समाविष्ट केली जाईल. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना रक्कम माघारी करावी लागेल
शाळा, कॉलेज अथवा एखाद्या संस्थांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोणत्याही परिस्थितीत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. त्याशिवाय एका दिवसांत पाच तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाही. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा क्लासेस घेता येणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top