₹20 Lakh Bribe Claim in Baramati – बारामतीत जागा बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवाराला प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे.
बारामती नगर परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
नगर परिषद निवडणुकीत शेवटच्या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही माघार घेतल्याने राज्यभर चर्चा सुरू झाली होती.
शेवटच्या दिवशी तब्बल ७७ उमेदवारांनी माघार घेतली होती. याबद्दल युगेंद्र पवार यांनी सांगितले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
त्यापैकी चार ठिकाणी आमचे उमेदवार होते. या चौघांना विरोधी गटाने प्रत्येकी २० लाख रुपये देऊन फोडल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. सर्वसामान्य उमेदवार पुढची १० वर्षे कष्ट करूनही २० लाख रुपये कमावू शकत नाहीत, त्यामुळे ते फुटले.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जी दहशतीची परिस्थिती होती, तीच आता नगरपरिषद निवडणुकीतही दिसत आहे. आमच्याविरोधात सत्ता आणि पैशाची मोठी शक्ती काम करत आहे.
त्यांच्या दबावामुळे असे दोन-तीन लोक जाणे साहजिकच आहे. दरम्यान, आठ जागा बिनविरोध झाल्यानंतरही बारामतीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उर्वरित जागांसाठी १६५ उमेदवार मैदानात आहेत.
हे देखील वाचा –









