2026 Padma Awards – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचबरोबर, प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पद्म पुरस्कार यादीत एकूण ५ जणांना पद्मविभूषण, १३ जणांना पद्मभूषण आणि ११४ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या यादीत कला, साहित्य, वैद्यकीय, कृषी, समाजसेवा आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या कला आणि चित्रपट क्षेत्रातील दीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार आहे. डिसेंबर २०२५ मध्ये धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. त्याचबरोबर अलका याज्ञिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गायनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानासाठी, तर भगतसिंह कोश्यारी यांना सार्वजनिक जीवनातील सेवेसाठी हा सन्मान जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते मामूटी यांना पद्मभूषणने गौरवण्यात आले. तर सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री तर आर. माधवन, प्रोसेनजीत चॅटर्जी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी झारखंड नेते शिबू सोरेन (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण बहाल केले आहे. पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील एकूण ८ जणांचा समावेश आहे. यामध्ये दिवंगत पीयूष पांडे(मरणोत्तर ), उदय कोटक यांना पद्मभूषण तर लोककलावंत रघुवीर खेडकर, डॉ. अर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा व श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली आहे.

लोककलावंत रघुवीर खेडकर
लोकनाट्य तमाशा या परंपरागत कलेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या खेडकर यांचे योगदान उल्लेखनीय आहे. यापूर्वी २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना तमाशा क्षेत्रातील पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवेळी खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला तमाशा सादर करण्याचा मानही मिळाला होता.
तर पालघर जिल्ह्यातील भिकल्या धिंडा यांनी तारपा लोकसंगीत जागतिक स्तरावर नेले. त्यांच्या घरात तारपा वादनाची दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या कलेसाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखले जाणारे परभणी येथील शेतकरी श्रीरंग देवबा लाड यांनी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयोगशील संशोधनाची दखल केंद्र सरकारने घेतली. मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांनी आशियातील पहिली ‘ह्यूमन मिल्क बँक’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांच्या या कार्याच्या योगदानामुळे त्यांना यावर्षी प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
For the year 2026, the President has approved conferment of 131 Padma Awards including two duo cases (in a duo case, the Award is counted as one) as per list below. The list comprises five Padma Vibhushan, 13 Padma Bhushan and 113 Padma Shri Awards. Nineteen of the awardees are… pic.twitter.com/8DDKIRpPTM
— ANI (@ANI) January 25, 2026
तर क्रीडा क्षेत्रात भारताचे दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासह माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार, भारतीय महिला हॉकी संघाची गोलकीपर सविता पुनिया, महिला हॉकीतील मार्गदर्शक बलदेव सिंग यांनाही पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे.
पद्म पुरस्काराने सन्मानित नावे – भगवंदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरळ), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा), नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तामिळनाडू), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तामिळनाडू), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड ), थिरुवरूर बख्तवसलम (तामिळनाडू), अंके गौड़ा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात) आर एंड एस गोडबोले (छत्तीसगड), राम रेड्डी ममिडी (तेलंगणा), सिमांचल पात्रो (ओडिशा), सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपुर), बुधरी ताथी (छत्तीसगड), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगणा), डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तामिळनाडू), हैली वॉर (मेघालय),इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़), के. पाजनिवेल (पुडुचेरी), कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (असम), पोकीला लेकटेपी (असम), आर. कृष्णन (तामिळनाडू), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक),टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार),धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात), शफी शौक़ (जम्मू-कश्मीर).
हे देखील वाचा –
लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला अंगणवाडी सेविकांचा नकार ; अतिरिक्त कामाचा ताण ; आंदोलनाचे संकेत









