250 MLAs, BJP Still Sees Sharad Pawar at the Centre: Supriya Sule
Sule Slams – 250 MLAs Yet Pawar Center – मराठा आरक्षणाच्या(Maratha reservation) मागणीसाठी आझाद मैदानात (Azad Maidan Mumbai)सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)काल पोहोचल्या. त्यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेत त्यांची तब्येत विचारली. मात्र बाहेर पडताना काही संतप्त आंदोलकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी केली.यावर प्रतिक्रिया देताना सरकारचे २५० आमदार असताना मात्र शरद पवार केंद्रस्थानी असल्याचा टोला त्यांनी भाजपाला(BJP)लगावला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. एखाद्या तरुणाला काही वेदना असतील तर त्याला समजून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं हे माझं कर्तव्य आहे. आझाद मैदानावर फार काही झालेलं नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? त्याभेटीदरम्यान जरांगे पाटील यांना थकवा असल्याने फक्त तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि सरकारने त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष द्यावे अशी विनंतीही केली.
त्या पुढे म्हणाल्या की,एकीकडे आम्हाला छोटा आणि संपलेला पक्ष म्हणतात आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू शरद पवार ठरतात. त्यांच्या पक्षाकडे २५० आमदार, ३०० खासदार आहेत असे सांगत भाजपा त्यांच्याकडेच वळतो ही कमालच आहे. सलग अकरा वर्ष भाजपाचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य आहे. २०१८ साली फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि उपायही सुचवले होते. आता तेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सत्तेत आहेत. मग त्यांनी ते उपाय अंमलात आणावेत.
सध्याचे सरकारच आंदोलनाला जबाबदार आहे. जर निर्णय घ्यायचाच असेल तर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा, कॅबिनेट घ्या आणि अधिवेशन बोलवा. आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी जाहीर करा. गृहखात्याकडे माहिती असेल तर आम्हालाही द्या, नाहीतर सरकार अपयशी ठरेल.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मराठा आंदोलकांना मदत करता का? एकनाथ शिंदे म्हणाले…
Sharad Pawar :शरद पवारांचा नाशिकमध्ये १४ सप्टेंबरला शेतकरी मोर्चा