5 Dussehra Melava Despite Rains – महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून अनेक भागात शेती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बळीराजा आक्रोश करत असताना राज्यात होत असलेल्या पाच दसरा मेळाव्यांबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे.
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा होणार आहे. यंदा संघ शताब्दीमुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगाव येथील नेस्को मैदानात होणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन स्थळात बदल करण्यात आला आहे.
भाजपा मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर होणार आहे. त्याचवेळी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे बीड तालुक्यातील नारायणगडावर मेळावा घेणार आहेत.
यंदा पोहरागड येथे पहिल्यांदाच बंजारा समाजाचाही दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, या दसरा मेळाव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर तब्बल ६३ हजार कोटी रुपये खर्च होत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. ही उधळपट्टी थांबवून हा पैसा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावर उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार करत, दसरा मेळावा रद्द करण्याचा सल्ला सरसंघचालकांनी द्यावा, असे म्हटले आहे.
हे देखील वाचा –
मला शांतता नोबेल द्या! अमेरिकेचा अपमान करू नका!ट्रम्प यांचा हट्ट ! सात युद्ध थांबवल्याचा दावा
भिवंडीत मराठीची गरज काय?अबू आझमींचे वादग्रस्त विधान
आशिया कप ट्रॉफीवरून मोठा वाद! BCCI च्या पदाधिकाऱ्यांचा ACC बैठकीतून ‘वॉकआऊट