Home / News / 70K Staff for Mumbai Polls : ७० हजार कर्मचारी मुंबई निवडणुकीच्या तयारीला

70K Staff for Mumbai Polls : ७० हजार कर्मचारी मुंबई निवडणुकीच्या तयारीला

70K Staff for Mumbai Polls – पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (MNC election)सध्या जोरदार तयारी सुरू आहे....

By: Team Navakal
70K Staff for Mumbai Polls


70K Staff for Mumbai Polls – पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची (MNC election)सध्या जोरदार तयारी सुरू आहे. पालिका आणि राज्य सरकारचे सुमारे ७० हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतले आहेत.पालिकेच्या निवडणूक विभागाने साडेसहा हजार बुथस्तरीय अधिकाऱ्यांची (BLO) नेमणूक केली आहे.


गेल्या महिन्यापासून पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंबंधी कामांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी १० हजार १११ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या ५०० ते १००० ने वाढविली जाणार आहेत.

पालिका मुख्यालयात तळ मजल्यावर जिथे माहिती तंत्रज्ञान विभागाचे कार्यालय आहे तिथेच मुख्य नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. प्रभागांच्या रचनेवर मुंबईकरांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींची याठिकाणी छाननी करण्यात आली आहे.


राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गेल्या महिन्यात पालिका मुख्यालयाला भेट देऊन निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार याद्यांची विभागणी, मतदान यंत्रांची संख्या, त्या ठेवण्याची व्यवस्था इत्यादीसंबंधी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.


हे देखील वाचा 

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश?राणे पिता-पुत्रांच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

क्लबमध्ये मुलींसाठी सुविधा हव्यात!सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

उत्तर प्रदेशमध्ये जातींवर आधारित राजकीय मोर्चे काढण्यावर बंदी

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या