८०० कोटींचा रूग्णवाहिका घोटाळा; श्रीकांत शिंदेंच्या संस्थेकडे पैसा वळवला !राऊतांचा खळबळजनक आरोप

₹800 Crore Ambulance Scam ! Funds Diverted to Shrikant Shinde's Foundation

₹800 Crore Ambulance Scam ! Funds Diverted to Shrikant Shinde’s Foundation

मुंबई – राज्यात १०८ क्रमांकाच्या रूगणवाहिका सेवेमध्ये (108 ambulance tender corruption case)८०० कोटींचा घोटाळा झाला (₹800 crore ambulance scam Maharashtra)असून या घोटाळ्यातील पैसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संस्थेकडे वळते(Shrikant Shinde Medical Foundation controversy) करण्यात आले आहेत,असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.
झारखंड राज्यात झालेल्या मद्य घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या घोटाळ्याचा तपास करणारे भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे (एसीबी) (ACB probe ambulance scam)एक पथक मुंबई आले होते. त्यांनी सुमित फॅसिलिटी नामक कंपनीच्या अमित साळुंखे याला अटक केली आहे. हा अमित साळुंखे श्रीकांत शिंदे यांचा जवळचा माणूस मानला आहे. तो त्यांच्या गळ्यातील ताईत आहे.श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा तो आर्थिक कणा आहे. (Shrikant Shinde Medical Foundation controversy)त्याला झारखंडमधील मद्य घोटाळयात का अटक करण्यात आली याचे कारण मद्य घोटाळ्याचा श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनशी संबंध आहे. ही संस्था श्रीकांत शिंदे यांची आहे. या संस्थेकडे मद्य घोटाळ्यातील पैसे वळते करण्यात आले आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेसाठी १०० कोटींची निविदा ८०० कोटींवर गेली. हा अतिरिक्त पैसा कोणाच्या घशात गेला याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे,असे राऊत यांनी सांगितले.(Is CBI investigating Shinde family?)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची गच्छंती अटळ आहे. संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड आणि माणिकराव कोकाटे हे ते चार मंत्री आहेत. (Scam in Maharashtra health system)भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचा अपमान, नोटांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे आदि प्रकरणांमुळे सरकारची प्रतिष्ठा पार धुळीला मिळाली आहे. परिस्थिती फडणवीस यांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. फडणवीस यांचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये आहे. त्यामुळे फडणवीस दिल्लीतील नेत्यांकडे सल्लामसलत करण्यासाठी गेले आहेत. त्यांना वरपासून खालपर्यंत साफसफाईची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे,असे राऊत म्हणाले.