9 workers missing after landslide following cloudburst in Uttarakhand
डेहराडून – उत्तराखंडमध्ये(Uttarkhand) मुसळधार पाऊस सुरू असून काल(uttarkashi) उत्तरकाशी भागात ढगफुटी(cludburst) झाली. त्यानंतर झालेल्या भूस्खलनात (landslaiding) ९ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुसळधार पावसामुळे चार धाम यात्रा पुढील २४ तासांसाठी स्थगित केली आहे
अतिवृष्टीमुळे बागेश्वर येथील शरयू नदीची पाणीपातळी वाढली आहे. अलकनंदा आणि सरस्वती या नद्याही धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावरील पालीगड ओजरी डाबरकोट परिसरात सिलाई बंदजवळ ढगफुटी झाली. त्यामुळे बांधकामाधीन हॉटेलवर भूस्खलन झाले. यानंतर तेथे राहणारे ९ कामगार (workers missing)बेपत्ता झाले आहेत. कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलीस व बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेपत्ता कामगारांचा शोध सुरू केला. त्यामध्ये महिला कामगारही बेपत्ता असल्याची माहिती आहे. उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत कुमार आर्य यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ४ ते ५ किमीच्या परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यात ९ कामगार बेपत्ता झाले. पोलीस,(SDRF )एसडीआरएफ, एनडीआरएफ(NDRF), महसूल, एनएच बारकोट, आरोग्य विभागाच्या पथकांकडून मदत आणि शोध मोहीम सुरू आहे. कामगारांच्या ज्या तंबूच्या जागी भूस्खलन झाले. त्याठिकाणी १९ कामगार तंबूत राहत होते. त्यापैकी १० कामगार सुरक्षित आहेत.
गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे चार धाम यात्रा(Char dham yatra) पुढील २४ तासांसाठी स्थगित केली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे यात्रेकरूंना थांबवण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.