Aaditya to Expose Voting Scam – २७ ऑक्टोबर रोजी उबाठा पक्षाने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी वरळी एनएसआय डोम येथे निर्धार मेळावा आयोजित केला आहे . या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काँग्रेस नेते राहुल गांधींप्रमाणे बोगस वोटिंग बॉम्ब फोडणार आहेत,अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. मुंबईच्या मतदार याद्यातील घोटाळा ते उघड करणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी आणि बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची याविषयी मार्गदर्शनही करणार आहेत. उबाठाचे मुंबईतील नेते, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वरळी डोम येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे, असेही राऊत म्हणाले.
दिल्लीत राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण करीत मतचोरी उघडकीस आणली अगदी तशाच पध्दतीने मुंबईतील मतदार यादीतील घोळाबाबत आदित्य ठाकरे हे या मेळाव्यात सादरीकरण करणार आहेत. मुंबईत शिवसेनेने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली आहे. या यादीत प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याबाबत मार्गदर्शन मेळाव्यात केले जाईल.
हे देखील वाचा –
Marathi Language Viral Video : विमानात मराठी अमराठी वाद पेटला; मुंबईत जाताय मराठी यायलाच हवी..









