Abu Salem: अबु सालेमला ६० वर्षे तुरुंगात रहावे लागेल सरकारची हायकोर्टाला माहिती

Abu Salem will have to remain in prison for 60 years, Government informs High Court

मुंबई – भारत आणि पोर्तुगाल यांच्यामध्ये गुन्हेगार हस्तांतरणाबाबत झालेल्या कायद्यानुसार गँगस्टर (Abu Salem 60 years jail)अबु सालेमला शिक्षेचा प्रत्यक्ष २५ वर्षांचा कालावधी तुरुंगात रहावे लागेल किंवा शिक्षेतील माफीचा किंवा सवलतीचा कालावधी समाविष्ट केल्यास ६० वर्षे तुरुंगात रहावे लागेल. त्यानंतरच तो तुरुंगातून सुटका करण्यास पात्र ठरेल, असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या शपथपत्राद्वारे सांगण्यात आले आहे.(1993 Mumbai blasts accused)

अबु सालेमच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये असा दावा करण्यात आला आहे की , त्याच्या कारावासाची २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात यावे.या याचिकेवर स्पष्टिकरण करताना राज्य सरकारच्या वतीने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अण्णा ए मुगुटराव यांनी हे शपथपत्र न्यायालयात दाखल केले.अबु सालेम हा ४ जुलै २०२४ पासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे.(prison sentence)

सालेमच्या वतीने अॅड फरहान शाह यांनी याचिका दाखल केली आहे.

त्यात त्यांनी असा दावा केला आहे की, सालेमने सन २००५ ते २०१७ अशी १२ वर्षे कच्चा कैदी म्हणून तुरुंगात व्यतीत केली आहेत. त्यानंतर दुसऱ्या एका खटल्यात दोषी ठरल्याने आणखी १० वर्षे त्याने तुरुंगात काढली आहेत.तुरुंगातील त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी त्याला तीन वर्षांची शिक्षेत सवलत मिळाली आहे.त्या व्यतिरिक्त त्याने पोर्तुगालच्या तुरुंगात व्यतित केलेल्या कालावधीसाठी त्याला शिक्षेत सवलत मिळाली आहे.हा सर्व कालावधी सुमारे २५ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याने शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.