Complaint Filed Against Actor Kiran Mane by ABVP in Nashik Over Social Media Post
ABVP Complaint Against Kiran Mane – अभिनेता किरण माने (Actor Kiran Mane)यांनी नेपाळ अशांततेबद्दल लिहिलेली एक सोशल मीडिया पोस्ट वादात सापडली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्रमक भूमिका घेत नाशिक सायबर (Nashik Cyber) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तानाजी शेलार यांनी ही तक्रार दिली आहे.
अभिनेता माने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहितात, की भक्त डुक्कर पिलावळींनो नेपाळ बघत आहात ना? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट.
अभाविपचे तानाजी शेलार यांनी तक्रारीत म्हटले, की अभिनेता किरण मानेच्या पोस्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानकारक मजकूर लिहिला आहे. याशिवाय पोस्टमध्ये लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारे आणि जनतेत द्वेष पसरवणारे विधान केले आहे. यामध्ये एका समाजाविषयी अनाजीपंत असा उल्लेख करून अपमानकारक टिप्पणी करून एका विचारप्रवाहाच्या नेतृत्वाची तुलना कुख्यात गुन्हेगारांशी केली आहे.
हे देखील वाचा –
एल्गार परिषद जामीन कोर्टाने तुरुंगाधिकाऱ्याला फटकारले
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून आता थेट CRPF ने पाठवले पत्र; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार
‘लाडकी बहीण’ योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती