Actor Dharmendra to Receive Home Treatment – ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यांच्यावर यापुढे घरीच उपचार केले जाणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीचकँण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दिवसभर त्यांच्या प्रकृतीला आराम पडला नव्हता. त्यानंतर कालपासून त्यांनी उपचारांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली व त्यांची तब्येत सुधारली असे सांगण्यात आले . त्यांना आज सकाळी साडेसात वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांच्यावर आता घरीत उपचार केले जाणार आहेत.
धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरली. त्यावर त्यांची पत्नी हेमामालिनी व कन्या इशा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांचा पुत्र अभिनेता सनी देओलने त्यांच्यासोबतचे रुग्णालयातील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले. त्यात ते स्वस्थपणे बसलेले दिसले. त्यानंतर आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या डिस्चार्जविषय़ी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने एक पत्रकही प्रसारित केले.
हे देखील वाचा
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडली, अचानक चक्कर आल्याने तातडीनं रुग्णालयात दाखल
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर! निधनाच्या अफवेवर पत्नी-मुलगी संतापल्या; म्हणाल्या…









