विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी २५ जुलैपर्यंत जोरदार कोसळणार

After a Break, Rain Returns Heavy rain Expected Until July 25

After a Break, Rain Returns Heavy rain Expected Until July 25

मुंबई – राज्यात मागील आठवड्यात बहुतांश भागात विश्रांती घेणाऱ्या (maharashtra rain)पावसाने कालपासून पुन्हा हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशाजवळ पोहोचला होता. मात्र हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असल्याचे जाहीर केल्याने(mumbai) नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. हवेचा दाब कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. या परिस्थितीत पावसाचा सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात असणार आहे.
यादरम्यान मुंबई शहर आणि (city)उपनगरातही काल सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला.अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, पवई, दादर, वरळी, प्रभादेवी, मुलुंड, भांडूप, नाहूर,या भागात पहाटेपासून पाऊस सुरु होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.तर अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केला. आज सकाळपासून रत्नागिरीत ३२ मिमी आणि ठाण्यात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय २० ते २५ जुलै दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, पुणे , लातूर, धाराशिव, विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांमध्ये याच दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.