Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताला (Ahmedabad Plane Crash)तब्बल दहा महिने उलटल्यानंतर , पीडितांच्या जवळपास 30 कुटुंबीयांनी Narendra Modi यांना पत्र (Letter) लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स (Black Box) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder – CVR) मधील माहिती जाहीर करण्याची विनंती केली आहे.
आम्हाला पैसे (Compensation) नकोत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. अपघातका झाला आणि त्यामागे काही तांत्रिक बिघाड होता का, हे आम्हाला समजले पाहिजे,” असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर, जर ही माहिती सार्वजनिक करता येत नसेल, तर ती किमान कुटुंबीयांना खासगीरित्या (Privately) उपलब्ध करून द्यावी, असा आग्रहही त्यांनी पत्रातून मांडला आहे.
कुटुंबीयांनी पत्रात नमूद केले आहे की, आम्हाला आर्थिक मदत नको आहे, आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. दुर्घटना का घडली ? त्यामागे तांत्रिक बिघाड होता का? हे समजणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर ही माहिती सार्वजनिक करणे शक्य नसेल, तर ती किमान कुटुंबीयांना वैयक्तिकरित्या देण्यात यावी. कुटुंबीयांनी या पत्राच्या प्रती विमान दुर्घटना अन्वेषण विभाग, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही पाठवल्या आहेत.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनकडे जाणारे बोईंग ७८७-८ प्रकारचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि इतर १९ जणांसह एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता.विमान दुर्घटना अन्वेषण विभागाने मागील वर्षी जुलै महिन्यात प्राथमिक अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल येत्या जून महिन्यात, दुर्घटनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त जाहीर होण्याची शक्यता आहे.
कुटुंबीयांनी विमान कंपनीवरही मदतीचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. अपघातात आईला गमावलेल्या किंजल पटेल यांनी सांगितले की, पीडितांच्या वस्तू ओळखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर अनेक अडचणी येत आहेत. संकेतस्थळावर हजारो वस्तूंची यादी आहे; मात्र छायाचित्रे अस्पष्ट असल्याने ओळख पटवणे कठीण जाते.
खेडा येथील रोमिन वोरा यांनी सांगितले की, तांत्रिक साधनांची कमतरता असल्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. “एकच पत्रव्यवहार पत्ता उपलब्ध असून प्रतिसाद मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. ग्रामीण भागातील अनेकांना या पद्धतींचा वापर करणे कठीण जाते. दुर्घटनेत २४ वर्षीय मुलगा गमावलेल्या निलेश पुरोहित यांनी, कोणतीही भरपाई ही आमची पोकळी भरू शकत नाही. आम्हाला केवळ सत्य जाणून घ्यायचे आहेअशी भावना व्यक्त केली.
अहमदाबाद विमान दुर्घटना; 260 जणांचा मृत्यू, देश हादरला

अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. Air India चे AI171 हे ड्रीमलायनर विमान लंडनकडे निघाले असताना उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले12 जून 2025 रोजी घडलेल्या या अपघातात Boeing 787-8 Dreamliner हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेत विमानातील 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, तसेच जमिनीवरील 19 जणांचा बळी गेला. एकूण मृतांचा आकडा 260 वर पोहोचला.या विमानातील प्रवासी वेगवेगळ्या कारणांसाठी लंडनकडे निघाले होते. काही जण शिक्षणासाठी, काही व्यवसायासाठी तर काही आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रवास करत होते. या घटनेमुळे देशभरातून शोक व्यक्त केला जात असून, ही दुर्घटना अलीकडील काळातील सर्वात मोठ्या विमान अपघातांपैकी एक मानली जात आहे.
तपास सुरूच; अंतिम अहवाल जूनमध्ये?

पीडित कुटुंबीयांनी पत्राच्या प्रती विमान अपघात अन्वेषण ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB), नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation – DGCA) आणि गुजरातचे मुख्यमंत्री Bhupendra Patel यांनाही पाठवल्या आहेत. AAIB ने गेल्या वर्षी जुलैमध्ये प्राथमिक अहवाल (Preliminary Report) सादर केला होता. अंतिम अहवाल (Final Report) जून 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे दरम्यान, इटलीतील वृत्तपत्र Corriere della Sera ने पायलटवर (Pilot) आरोप करणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र AAIB ने तो फेटाळत (Denied) “तपास अद्याप सुरू आहे (Investigation is ongoing), कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही,” असे स्पष्ट केले आहे.
एका सेकंदात सर्व संपलं; फ्युएल कटऑफ स्विचमुळे अपघात?
अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेमागील कारणांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. Boeing 787-8 Dreamliner प्रकारचे हे विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांतच कोसळले होते.

Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) च्या प्राथमिक अहवालानुसार, विमानाच्या दोन्ही इंजिनना इंधन पुरवठा करणारे ‘फ्युएल कटऑफ स्विच’ अचानक ‘रन’वरून ‘कटऑफ’ स्थितीत गेले. हे दोन्ही स्विच एका सेकंदाच्या फरकाने बदलल्याने इंजिनचा इंधन पुरवठा थांबला आणि दोन्ही इंजिन बंद पडले. या घटनेदरम्यान कॉकपिटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे Cockpit Voice Recorder (CVR) मधील संभाषणातून स्पष्ट झाले आहे. एका वैमानिकाने दुसऱ्याला विचारले, “तू इंधन का बंद केलं?”, त्यावर दुसऱ्याने “मी नाही केलं” असे उत्तर दिल्याचे नोंदले गेले आहे. या संवादातून ही घटना अचानक घडल्याचा आणि तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघात टाळण्यासाठी वैमानिकांनी तत्काळ इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यात इंजिन क्रमांक 1 काही प्रमाणात सुरू झाले, मात्र इंजिन क्रमांक 2 पूर्णपणे बंदच राहिले. त्यामुळे विमानावरील नियंत्रण गमावले गेले आणि अखेर दुर्घटना घडली.
242 पैकी फक्त 1 प्रवासी बचावला ; 11A सीट ठरली लकी

या विमान दुर्घटनेत केवळ एकच प्रवासी जिवंत बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Air India चे लंडनकडे जाणारे AI171 विमान उड्डाणानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांत कोसळले होते.या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला आहे. विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एकच प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला.अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11A या सीटवर बसलेला विश्वासकुमार रमेश हा एकमेव प्रवासी जिवंत राहिला. पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी याची पुष्टी केली आहे.
अपघातानंतर विश्वासकुमार रमेश हे स्वतः चालत विमानाच्या अवशेषांमधून बाहेर पडले होते. हा थरारक प्रसंग पाहून संपूर्ण जग स्तब्ध झाले. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेतून वाचणे हा एक “चमत्कार” असून स्वतःला ‘जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती’ असल्यासारखे वाटते. मात्र, या घटनेमुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. या अपघातात त्यांचा धाकटा भाऊ अजय याचाही मृत्यू झाला. तो विश्वासकुमार यांच्या काही सीट अंतरावर बसला होता. त्यामुळे जिवंत राहिल्याचा आनंद आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दुःख—अशी दुहेरी भावना त्यांच्या मनात आहे.
1998 आणि अहमदाबाद दुर्घटनेत 11A सीटचे कनेक्शन
रुआंगसक लॉयचुस्क हे थायलंडमधील गायक 1998 साली झालेल्या विमान अपघातातून बचावले होते. विशेष म्हणजे, तेही त्या वेळी विमानातील 11A या सीटवरच बसलेले होते. त्या दुर्घटनेत तब्बल 101 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.अहमदाबाद दुर्घटनेत बचावलेले विश्वासकुमार रमेश आणि 1998 मधील अपघातातून बचावलेले लॉयचुस्क—या दोघांचा सीट नंबर एकच असल्याने हा योगायोग चर्चेचा विषय ठरत आहे.
लॉयचुस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भारतामधील विमान अपघातात बचावलेल्या प्रवाशाचा सीट नंबर 11A आहे, आणि माझाही सीट नंबर त्यावेळी तोच होता.” तसेच त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
1998 साली लॉयचुस्क Thai Airways Flight TG261 (काही अहवालांनुसार TG216 म्हणूनही उल्लेख) या विमानातून प्रवास करत होते. हे विमान बँकॉकहून सुरत थानी येथे उतरणार होते. मात्र लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 132 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत 101 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. लॉयचुस्क हे या अपघातातून बचावलेल्या मोजक्या प्रवाशांपैकी एक होते.
हे देखील वाचा –
शरद पवारांना कोल्हापुरात धक्का ; समरजित घाटगे भाजपात घरवापसी करणार! पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला!
तेहरानवर अमेरिकेचा भीषण हल्ला! इराणचे बडे लष्करी अधिकारी मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
तुमचा गॅस सिलिंडर घरी कधी येणार? आता मोबाईलवर पाहा ‘लाइव्ह स्टेटस’










