Ajit Pawar Backs Tapovan Protest – नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून जनआक्रोश सुरु आहे. स्थानिकांच्या तपोवन वाचवा मोहिमेला अभिनेते आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते सयाजी शिंदे यांनी खुलेपणाने साथ दिली आहे. त्यांच्या या भूमिकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठिंबा दिला.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न केला जाईल पण कुंभमेळ्यासाठी आवश्यक कामे वास्तव पाहता टाळता येणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका मांडली.
अजित पवार यांनी एक्सवर लिहिले की,तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचाराने तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,तपोवनासंदर्भात आमचे मत आहे की, झाडे कापणे योग्य नाही. परंतु प्रयागराज कुंभमेळा १५ हजार हेक्टर जागेवर झाला. नाशिकमध्ये साधुग्रामची ३५० एकर इतकीच जागा आहे.
नाशिक शहरात रामबन आणि साधुग्रामच्या बाजूला दुसरी कोणतीही जागा नाही. झाडांच्या दाटीमुळे सध्याच्या ठिकाणी साधुग्राम करणे शक्य नाही. २०१५-१६ मधील गुगल इमेज बघितल्या तर त्यामध्ये याठिकाणी एकही झाड नाही. त्यावेळी राज्य सरकारने ५० कोटी वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतला होता.
आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत. तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही. आवश्यक ती झाडे कापली जातील. काही मोठी झाडे काढून आम्ही स्थलांतरीत करणार आहोत. पण या विषयावर राजकारण होणे चूक आहे. कुंभमेळा ही आपली प्राचीन आणि सनातन परंपरा आहे.
हे देखील वाचा –
भारत-अमेरिका व्यापार करार अनिश्चित राहिल्याने रुपया ९०.३०/डॉलरच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला









