Home / News / Metro Ticket : आता एकाच अ‍ॅपवरून सर्व मेट्रो तिकिटे मिळणार

Metro Ticket : आता एकाच अ‍ॅपवरून सर्व मेट्रो तिकिटे मिळणार

Metro Ticket – मुंबईतील (Mumbai)वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचे तिकीट आरक्षित करणे आता सोपे झाले आहे.वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे (Versova–Ghatkopar...

By: Team Navakal
Wadala–Kasarvadavali Metro 4

Metro Ticket – मुंबईतील (Mumbai)वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांचे तिकीट आरक्षित करणे आता सोपे झाले आहे.वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे (Versova–Ghatkopar Metro Line 1) संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वनने वन तिकीट हे अ‍ॅप आणले असून त्याद्वारे प्रवासी विविध मेट्रो मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी एकाच वेळी एकत्रित तिकीट आरक्षित करू शकणार आहेत. विविध मार्गांसाठी प्रवाशांना आता वेगवेगळी अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.

या अ‍ॅपचा वापर करताना सर्वप्रथम मोबाइलवर हे अ‍ॅप डाउनलोड करून मोबाइल नंबरद्वारे साइन-अप करावे लागेल.त्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी (OTP verification)करावी.यामध्ये जवळचे स्टेशन आपोआप निवडले जाईल,गंतव्य स्टेशन निवडून पुढे जावे लागेल.एका व्यवहारात जास्तीत जास्त चार तिकिटे खरेदी करता येतील.पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अ‍ॅपमध्येच क्युआर तिकीट जनरेट (QR-based ticket)होईल.

महामुंबईत जवळपास ४५० किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जाणार आहे.सध्या मुंबईत ७० किमीचे मेट्रो मार्ग सुरू आहेत.मात्र,या मार्गिकांचे संचलन एमएमएमओसीएल (MMMOCL), एमएमओपीएल आणि एमएमआरसी या तीन वेगवेगळ्या संस्थांकडून केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग करताना गोंधळ होऊ नये,यासाठी हे मेट्रो जाळे विस्तारत असताना महामुंबईत एकाच तिकीट प्रणालीची गरज निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएमओपीएलने ओएनडीसी नेटवर्कवर (ONDC network)’वन तिकीट अॅप उपलब्ध केले आहे.


हे देखील वाचा –

भविष्यात मुलगी देखील राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

डिकी बर्ड: पंचगिरीतील ‘लेजेन्ड’! भारतीय संघाच्या 1983 विश्वचषक विजयाचे होते साक्षीदार

GST चा ग्राहकांना मोठा फायदा! 5 लोकप्रिय डिझेल SUV च्या किमतीत 1.86 लाख रुपयांपर्यंत कपात

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या