Home / News / तुळजापुरात बोगस मतदार नोंदणी ! कारवाईस टाळाटाळ ! खा. निंबाळकरांचा आरोप

तुळजापुरात बोगस मतदार नोंदणी ! कारवाईस टाळाटाळ ! खा. निंबाळकरांचा आरोप

MP Omraje Nimbalkar

धाराशिव – तुळजापूर विधानसभा क्षेत्रात बोगस मतदार नोंदणी झाली आहे. मात्र निवडणूक आणि प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar)यांनी पत्रकार परिषदेत केला.

खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly elections,)मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वाढल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार तत्कालीन तालुका प्रमुख जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे (election officer)तक्रार केली होती. प्रत्येक बूथमध्ये बोगस नोंदणी (registrations)आढळली. चावडी वाचनादरम्यान ६ हजार बोगस नावे असल्याचे स्पष्ट झाले. यावर १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, ९ महिने उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

पुढे ते म्हणाले की, काही नेत्यांच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नावेही मतदार याद्यांमध्ये बोगसपणे समाविष्ट केल्याचे स्पष्ट झाले. याचा तपास का झाला नाही? मोबाईलद्वारे (mobile-based registrations)जर कोणती गैरप्रकाराची नोंदणी झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. पण त्यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. निवडणूक आयोग (Election Commission) वारंवार विचारतो की, तक्रार का केली नाही? आम्ही वेळेत तक्रार केली होती, पण अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.