Anil Parab Charged in Assault Case– शिवसेना शाखा पाडण्याची कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी उबाठाचे आमदार अनिल परब यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परब यांच्यासह अन्य १० जणांचाही यामध्ये समावेश आहे.
२०२३ साली वांद्र्यातील अनधिकृत शाखा तोडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची तोडफोड झाल्यामुळे शिवसैनिक संतापले होते. त्यानंतर अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली उबाठाने मुंबईतील सांताक्रूझ येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता.
हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयावर नेण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांनी सहाय्यक अभियंता अजय पाटील (४२) यांना मारहाण करून धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी खासदार आणि आमदारांविरोधातील खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात न्यायमूर्ती सत्यनारायण नावंदर यांच्या समोर झाली. या वेळी न्यायालयाने परब आणि इतरांविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.
परब यांनी न्यायालयात आपल्याविरोधातील सर्व आरोप बिनबुडाचे असून आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
हे देखील वाचा –
दार्जिलिंगमध्ये पूल कोसळून ७ मृत्यूमुखी
बेकायदेशीर अटकेला आक्षेप ! सरकारला १ लाखांचा दंड ! उच्च न्यायालयाची कारवाई