Home / News / मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

Another Maratha Protester Dies During Mumbai Agitation Another Maratha Protester Dies- मराठा आरक्षण (Maratha protester)आंदोलनादरम्यान मुंबईत आणखी एका मराठा बांधवाचा...

By: Team Navakal
Another Maratha Protester Dies During Mumbai Agitation

Another Maratha Protester Dies During Mumbai Agitation

Another Maratha Protester Dies- मराठा आरक्षण (Maratha protester)आंदोलनादरम्यान मुंबईत आणखी एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या (heart attack)झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील शिवनेरीजवळ (Shivneri)एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. मृताचे नाव विजय घोगरे (Vijay Ghogare,)(रा. टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर( Latur) असे असून, आंदोलनादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil’s)यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. रेल्वे, खासगी गाड्या आणि अन्य वाहनांतून कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याआधी जुन्नर येथेही एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे दोन दिवसांत तिसऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याने मराठा समाजात संताप आणि शोककळा पसरली आहे. विजय घोगरे यांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आमचे दोन बळी घेतले असा गंभीर आरोप केला आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका

ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही मिळू शकते नोबेल पुरस्काराचे नामांकन; जाणून घ्या का सुरू आहे चर्चा

पुणे ते नाशिक प्रवास फक्त 20 मिनिटांत! वाहतूक कोंडी संपवण्यासाठी नवा प्लॅन

Web Title:
संबंधित बातम्या