Approval Granted for Major Metro and Transport Projects Across the State
Cabinet Clears Key Metro Projects – राज्यातील विविध मेट्रो (Metro) प्रकल्पांच्या निधी व आर्थिक तरतुदींना आज मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये मुंबई, ठाणे, (Thane) पुणे, (Pune)नागपूरसह (Nagpur) विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
आजच्या बैठकीत मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका- ११ प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यासाठी २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करण्याला आली आहे. ठाण्यातील अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी या मेट्रोची दुसरी मार्गिका बांधणे, त्याच प्रमाणे त्याचा चांदणी चौकापर्यंत विस्तार करणे, रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार करणे, पुणे मेट्रो मार्ग क्रमांक ४ (खडकवासला स्वारगेट (Swargate) हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी बाहेरुन कर्ज घेण्यास त्याचप्रमाणे त्याचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यासाठी, प्रकल्पांचे करारनामा, कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यासाठही मान्यता देण्यात आली.
त्याचप्रमाणे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे. नगर विकास विभागांतर्गत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-३ व ३ अ (MUTP-3A) प्रकल्पातील लोकल (उपनगरीय रेल्वे) गाड्यांच्या खरेदीसाठीच्या कर्जाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी बाहेरून कर्ज घेण्याऐवजी पूर्णतः रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने ५०% आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
61 लाख रुपयांचा क्लेम नाकारला? विमा कंपनी वादाच्या भोवऱ्यात; टीका होताच दिले स्पष्टीकरण
‘मराठा आरक्षणाच्या जीआरला 100 पैकी उणे शून्य मार्क’; विनोद पाटील यांची टीका
10,000 रुपयांचा स्मार्ट टीव्ही फक्त 5,000 रुपयांमध्ये; जाणून घ्या कुठे आणि कसा मिळेल