Home / News / Asaram : आसारामची सुरत येथील सरकारी रुग्णालयात पूजा!

Asaram : आसारामची सुरत येथील सरकारी रुग्णालयात पूजा!

Asaram- बलात्काराच्या आरोपाखाली (Rape charges) शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या फोटोची पूजा आणि आरती केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला...

By: Team Navakal
Asaram

Asaram- बलात्काराच्या आरोपाखाली (Rape charges) शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या फोटोची पूजा आणि आरती केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या (Gujarat) सुरत शहरातील एका सरकारी रुग्णालयातला (Government hospital)हा व्हिडिओ आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली.

आसारामच्या समर्थकांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्याचा फोटो ठेवून पूजा आणि आरती केली. या वेळी मंत्रोच्चार आणि भजनेही गायली गेली. या पूजेमध्ये बालरोग विभागातील डॉ. जिगिशा पटाडिया, काही परिचारिका आणि सुरक्षा कर्मचारीही सामील झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार वादात सापडला.

रुग्णालयाचे आरएमओ (Resident Medical Officer) डॉ. केतन नायक (Dr. Ketan Nayak) यांनी तातडीने या प्रकरणात कारवाई केली आहे. त्यांनी सांगितले की, काही लोकांनी फळे वाटण्याची परवानगी मागितली होती, जी मी तोंडी दिली होती. पूजेची माहिती मिळाल्यावर मी तातडीने माझ्या सहकाऱ्याला तिथे पाठवून सर्व प्रकार बंद करायला लावला. या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला काढून टाकण्यात आले आहे. पण डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयात कोणतीही वस्तू वाटप करायची असल्यास लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


हे देखील वाचा 

क्रिकेटप्रमाणे पाकिस्तानच्या फुटबॉलपटूचे सेलिब्रेशनही वादात

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय; मायक्रोसॉफ्टऐवजी स्वदेशी ‘Zoho’ वापरणार, जाणून घ्या वैशिष्ट्ये

कमी किमतीत आता अधिक सुरक्षित कार! फक्त 5 लाखांच्या बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ जबरदस्त गाडी

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या